कीर्तनकार शिवलिला पाटील यांना डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून स्केच प्रदान

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवामहाराष्ट्रातील सुप्रसिध्द विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक ह.भ.प.शिवलिला पाटील यांना विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांचे स्केच प्रदान केले. शिवलिला पाटील यांना टीव्ही रिऍलिटी शो बिग बॉस मराठी 3 मध्ये एक स्पर्धक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी राज्यामध्ये 1000 हून अधिक कीर्तने केली आहेत. शिवलिला यांनी डाॅ.डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्राचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डाॅ.संदीप डाकवे यांच्या बरोबर विजय माेिहते, सुरज जाधव, शिवलिला यांचे वडील ह.भ.प.बाळासाहेब पाटील, ह.भ.प.मधुकर महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते.

चित्रकलेत 7 रेकाॅर्ड केलेले डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सुमारे 15,000 पेक्षा जास्त मान्यवरांना त्यांची चित्रे भेट दिली आहेत. सांप्रदायिक क्षेत्रातील महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, प.पू.नंदगिरी महाराज, युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदूरीकर महाराज, महंत सुुंदरगिरी महाराज, पारनेरकर पंचांगकर्ते, धारेश्वर महाराज, राशीचक्रकार शरद उपाध्ये, देवाची आळंदीचे वंशज राष्ट्रसंत शेलारमामा, प.पू.आशिष महाराज, ह.भप.बाबा महाराज सातारकर, ह.भ.प.चिन्मय महााज सातारकर, भगवतीताई सातारकर, महानुभव पंताचे संत यांना चित्रे भेट दिली आहेत. तसेच त्यांच्या हस्ते विविध विशेषांकाचे प्रकाशन केले आहे.

वेगळया माध्यमात डाॅ.संदीप डाकवे यांनी शिवलिलाताई यांना दिलेले स्केच पाहून उपस्थितांनीही डाॅ.डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले.