कराड तालुक्यातील बामणवाडीची लक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा २४ रोजी.

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 कराड तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या बामणवाडीतील जागृत देवस्थान असलेली ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २४ मार्च पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.या यात्रेनिमित्त गेल्या सात दिवसांपासुन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असून त्याची सांगता आज बुधवारी झाली 

या यात्रेनिमित्त गुरुवारी २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता देवीला बडाम अर्थात नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम आणि फटाक्याची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर रात्री ११ वाजता तमाशा वगनाट्य सादर केले जाणार आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवार २४ मार्च रोजी सकाळी श्री लक्ष्मी देवीची मिरवणूक आणि दुपारी पुन्हा तमाशा वगनाट्य तसेच जंगी कुस्त्यांचा फड भरणार आहे.तरी परिसरातील भाविकांसाठी वार्षिक यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन बामणवाडी ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईस्थित श्री शिवशंभो मित्र मंडळाने केले आहे.