सोमवार पासून चाळकेवाडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.
कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील चाळकेवाडी येथे पारायण मंडळाच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन सोमवार दि 20/3/2023 ते दि 27/3/2023 पर्यंत करण्यात आले आहे. 

 सोमवार दि 20/3/2023 रोजी श्री भैरवनाथ मंदिरात देवाला अभिषेक व आरती करून ह,भ,प, विठ्ठल चाळके, ह,भ,प,शंकर चाळके यांच्या हस्ते विणा,ग्रंथ,मूर्ती पूजन, करून या पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. 

 या सप्ताहात पहाटे 4 ते सकाळी 6 वा काकड आरती पांडुरंगाची महापूजा सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ,7 ते 8 संत पंगत, रात्री 9 ते 11 दररोज कीर्तन सेवा यामध्ये ह,भ,प,विठ्ठल काटेकर महाराज गलमेवाडी, नारायण महाराज सलतेवाडी, कृष्णत महाराज कोळे,सचिन महाराज तामकने, सुरज महाराज अंतवडी,कुमार पार्थ महाराज सोंडोली,श्रीपाद महाराज सातारकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.

  सोमवार दि 27/3/2023 रोजी सकाळी 7 वा ज्ञानेश्वर ग्रंथाची सांगता 7 ते 9 दिंडी सोहळा 9 ते 11 यशवंत महाराज कुंभारगावकर यांचे काल्याचे कीर्तन सेवा होणार आहे या सर्व सप्ताह दरम्यान व्यासपीठ चालक कुंभारगावचे ह भ प यशवंत महाराज राहणार आहेत. काल्याच्या कीर्तन सेवे नंतर महाप्रसाद होणार आहे.