श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न.


घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालय घोगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वेळी सर्व HOD यांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व महिलांना पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 या वेळी संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सर्व महिलांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितली तसेच सर्व महिला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंन महिलांच्या हाताला आराम मिळत नाही. महिलांनी स्वतःचे व परिवारातील सर्व सदस्यांचे आवरून पुन्हा या ठिकाणी कामावर वेळेत पोहोचायचे असते या सर्व दगदगीमुळे महिलांचे आरोग्य खराब होते आहे. म्हणून सर्व महिलांचा दररोज योगा, ध्यान व मेडिटेशन करण्याचा सल्ला या वेळी दिला.तसेच या वेळी राधा गोसावी मॅडम यांनी आपल्या मनोगतामधे सांगितले कि मुला मुलींमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक द्यावी. 

या नंतर कोकरे मडम यांनी सांगितले कि महिला दिना दिवशी फक्त महिलेचा सन्मान न करता वर्षातील 365 दिवस तिला सन्मान मिळाला पाहिजे सदर कार्यक्रमाचे आभार श्री. पतंगे यांनी मानले .