आ.च. विद्यालय, मलकापूर येथे टेबल टेनिस-रोबो उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
खेळाचे महत्व लक्षात घेऊन आ.च. विद्यालय मलकापूर येथे टेबल टेनिस खेळाचा अधिक सराव होण्याच्या दृष्टीने अद्यावत रोबोचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. निजाम भाई मोमीन - स्टार बॉडी बिल्डर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री लक्ष्मण जिरंगे ,श्री कल्याणी संजय टेबल टेनिस प्रशिक्षक, श्री.अशोकराव थोरात(भाऊ)सचिव मळाईदेवी शिक्षण संस्था ,उत्तमराव पवार ,सतीश सुतार उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव अशोकराव थोरात भाऊ यांनी आधुनिक यंत्रणेचा प्रभावी वापर करून खेळातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असावे असे मत व्यक्त केले.तसेच खेळ हा आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतो असे मत श्री. लक्ष्मण जिरंगे यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.कुंभार मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन सौ.पाटील एस. ए.व आभार उपमुख्याध्यापक श्री .थोरात ए. बी.यांनी मानले.यावेळी पर्यवेक्षक बुरुंगले बी.जी.क्रीडा विभाग प्रमुख श्री .कराळे जे.एन.,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.