ढेबेवाडी वि.का.स सेवा सोसायटीस सर्वतोपरी सहकार्य करू : काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांचे आश्वासन.


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायची निवडणूक गेली २१ वर्षापासून बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवली असून या सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील (बापू) यांनी दिले

  ढेबेवाडी भाग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.या संचालक मंडळातील नवनिर्वाचित संचालकांचा हिंदुराव पाटील (बापू) यांनी सत्कार केला . यावेळी सोसायटीचे चेअरमन रमेश पवार, व्हा चेअरमन सदाशिव साबळे,संचालक श़ंकरराव पाटील, रामचंद्र माने,सुरेश मोहिते, लक्ष्मीबाई देवळेकर,सिताबाई जाधव,शशिकांत कदम,भाऊसो साबळे,बाबूराव साबळे, संतोष साबळे, विठ्ठल पाटील, शंकर पवार उपस्थित होते.

 यावेळी बोलताना हिंदुराव पाटील (बापू) म्हणाले की या संचालक मंडळात बहुतांशी संचालक जुनेच असून त्याना सोसायटीच्या कारभाराचा चांगला अनुभव असून या नवनिर्वाचित संचालकांना सर्वतोपरी सहकार्य करुन सोसायटीच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडवू असे म्हणाले. 

या वेळी अरविंद कुंभार यांनी स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले.