काळंबादेवी निधी संस्थेच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

तळमावले तालुका पाटण येथील काळंबादेवी निधी संस्थेच्या वतीने महिला दिन संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  ग्राम विकास अधिकारी सौ प्रतिभा थोरात व काळंबादेवी महिला पतसंस्थेच्या च्या चेअरमन सुजाता घाडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दिपप्रज्वलन केले.

यावेळी संस्थेच्या संचालिका सौ माया चोरगे, संगीता यादव, अनुसया खिचडे, छाया शिद्रुक, प्रिया पाटील, काजल पवार, सीमा बाबर, सुरेखा सुतार, अलका माने यांची प्रमुख उपस्थिती होती.                     

 यावेळी  कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी  ग्राम विकास अधिकारी प्रतिभा थोरात उपस्थित महिलांना मार्गदर्शन  करताना म्हणाल्या  महिलांनी आत्मसन्मान जपला पाहिजे.  स्वतःमध्ये व इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची ताकद स्त्री मध्ये असते. स्त्रीने आपली क्षमता बघून स्वतःला वेळ दिला पाहिजे त्यातून जे साध्य होईल त्याचा आपणास अभिमान असायला हवा व आपला आत्मसन्मान आपणच जपायला हवा. महिलांनी सकाळी व्यायाम करावा. आज शिक्षण क्षेत्रात मुली एक नंबरवर आहेत त्यामुळे  शासकीय नोकरीत व सामाजिक क्षेत्रात  त्यांना प्राधान्य आहे. या वेळी काळंबादेवी महिला पत संस्थेच्या चेअरमन सौ सुजाता घाडगे  यांचेवतीने प्रमुख अतिथी ग्राम विकास अधिकारी सौ प्रतिभा थोरात यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 






सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

शेवटी  संस्थेच्या सचिव सौ वैशाली गूढेकर यांनी आभार मानले.