पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून विविध गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.


दौलतनगर | कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडूण आलेले सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार समारंभप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून गावा-गावांमध्ये विकासाची कामे राबविण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. अशी ग्वाही या प्रसंगी दिली होती. राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्याकरीता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. दरम्यान नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत संदस्य यांचा सत्कार सोहळा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये दौलतनगर ता.पाटण येथे पार पडला.या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे हे ऑनलाईन उपस्थित राहून गावांचे विकास कामांना राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगीतले होते.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 71 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 25 लाख या प्रमाणे एकूण 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये पाडळोशी, वेखंडवाडी, कळंबे, झाकडे, मालदन, पाणेरी, घोटील, मोरगिरी, कडववाडी(नाणेगाव बु.), गिरेवाडी, हुंबरवाडी, गलमेवाडी, वर्पेवाडी (सळवे), कडवे खुर्द, रासाटी, नाव, ढाणकल, गोवोर, काढोली, काठी, शिरळ, कुसवडे, भारसाखळे, निवकणे, निवडे पुनर्वसन, राहुडे, जळव, घोट, मरळोशी, भुडकेवाडी, कोंजवडे, आवर्डे, तोंडोशी, कडवे बुद्रुक, नुने, डेरवण, जाळगेवाडी, माजगाव, सडावाघापूर, माथणेवाडी, जाधववाडी चाफळ, डिगेवाडी आडूळ, बनपेठवाडी येराड, येराड, शेडगेवाडी विहे, आबदारवाडी, ऊरुल,वेताळवाडी, नाडे, आडूळपेठ, आडूळ गावठाण, गारवडे, लेंढोरी, नाटोशी, साबळेवाडी, मराठवाडी, बनपूरी, भोसगाव, मत्रेवाडी, आंबवडे खुर्द, धजगावं, महिंद, ताईगडेवाडी, शेंडेवाडी, चाळकेवाडी, भिलारवाडी, मान्याचीवाडी, मालदन, सुतारवाडी मालदन तसेच सुपने मंडलातील गमेवाडी,आरेवाडी व उत्तर तांबवे या गावांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांना प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे सुमारे 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपानजी भुमरे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले असून मंजूर झालेल्या या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.