लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा दि.10 मार्च रोजी 113 वा जयंती सोहळा कार्यक्रम.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई येथे करणार अभिवादन.

दौलतनगर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 113 वा जयंती सोहळा कार्यक्रम शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता ना.शंभूराज देसाई यांचे शासकीय निवासस्थान "पावनगड" (बी-04), येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ना. शंभूराजजी देसाई व इतर मान्यवर हे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. तसेच दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथील “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात आलेल्या जयंती सोहळा कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. असे हे पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून सध्या मुंबई येथे राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने ना.शंभूराजजी देसाई हे मुंबई येथे आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ना. देसाई यांचे शासकीय निवासस्थान "पावनगड" (बी-04), येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ना. शंभूराजजी देसाई व इतर मान्यवर हे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. दरम्यान स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 113 वा जयंती सोहळा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजीत करण्यात आला आहे. स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद,हितचिंतक यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे