विदयार्थ्यांनी बौद्धिक क्षमता आत्मसात करावी : दुरिया पारडीवाला


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये रोटरी क्लब आॅफ मुंबई (दक्षिण)यांचे वतीने व सोनवडे गावचे सुपूत्र व जी.ए.रानडे विदयालय मुंबई या विदयालयाचे माजी प्राचार्य नवनाथ पानस्कर  यांच्या प्रयत्नाने 'हॅपी स्कूल' प्रोजेक्ट राबविणेत आला होता. त्यावेळी रोटिरियन दुरिया पारडीवाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागांतील मुले आज स्पर्धेच्या युगात शहरी मुलांच्याप्रमाणे उत्तुंग यश मिळवित आहेत. अशीच सतत विदयार्थ्यांनी बौद्धिक क्षमता आत्मसात केली पाहिजे तरच तो विदयार्थी स्पर्धेच्या युगात टिकून राहिल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांच्या निमित्ताने रोटरी क्लबच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कलामंच तसेच मुलींसाठी सुसज्ज असे स्वच्छतागृह, प्रयोगशाळा व ग्रंथालय यासाठी भौतिक सुविधा तसेच गरीब,गरजू हुशार विदयार्थ्यांसाठी गणवेश वाटप याचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमामध्ये नवनाथ पानस्कर,विदयालयाचे मुख्याध्यापक के.जे.चव्हाण, मोहिद पारडीवाला यांनी मनोगते व्यक्त केली,या कार्यक्रमासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव डी.एम.शेजवळ,सोनवडे गावचे सरपंच आत्माराम माने,दिनकर शेजवळ, साहेबराव घाडगे, राजाराम वर्पे, निवास पानस्कर, चंद्रकांत शेजवळ, ग्रामपंचायत सदस्या लता महाडिक, वैशाली महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती,

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर स्वागत संतोष कदम यांनी केले त आभार संजय डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विदयालयातील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विदयार्थी उपस्थित होते