उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवावी : रविराज देसाई दादा


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: मोरणा शिक्षण संस्थेच्या  न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये एस.एस.सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई हे होते. त्यावेळी ते म्हणाले की,हे विदयालय डोंगराळ दुर्गम भागातील असून पाच-सहा कि.मी.पायी प्रवास करून विदयार्थी शिक्षण घेत आहेत. परंतू कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लास न लावता विदयालयातील शिक्षकांनी केलेल्या अध्यापन तसेच मार्गदर्शनावरच हे विदयार्थी चांगले गुण मिळवित आहेत. या विदयालयाचा इ.10 वी च्या वर्गाचा 100% निकाल हा सतत लागत असतो,तशीच निकालाची परंपरा कायम ठेवा असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी शालेय तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांचा तसेच एन.एम.एम.एस.परीक्षा 2023 या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे,एस.डी.शेजवळ तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव एन.एस.कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली तसेच विदयार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्ही.ए.घोणे यांनी केले तर आभार टी.व्ही.शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सर्व आजी-माजी विदयार्थी उपस्थित होते.