श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आ. च. विद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश.


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आ. च. विद्यालय मलकापूर येथील विद्यार्थ्यांनी भारत निवडणूक आयोगातर्फे आयोजित केलेल्या निबंध वक्तृत्व रांगोळी स्पर्धांमध्ये भरगोस यश संपादन केले. दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या स्पर्धा राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या होत्या.        

           निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिनव रंगराव देसाई द्वितीय क्रमांक समृद्धी पांडुरंग यादव तृतीय क्रमांक प्रज्ञा आबासो यादव 

         वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रुद्रा अजित पाटील द्वितीय क्रमांक भाग्यश्री सचिन यादव तृतीय क्रमांक नेत्राली विजय माने 

            रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नंदिनी बंडू चाळके द्वितीय क्रमांक वासंती उत्तम थोरात तृतीय क्रमांक विद्या संजय कदम या या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले या विद्यार्थ्यांचे श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव शेती मित्रअशोकराव थोरात यांनी प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गोड कौतुक करूनअभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अरुणा कुंभार यांनी केले. त्याबरोबर त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक श्री भरत बुरुंगले यांनी मानले .

         यशस्वी विद्यार्थ्यांना एस.आर.भोरे, कुमारी एस. एच. माने, श्री एम.पी.फराळे.कुमारी एस बी खाडे,सौ उर्मिला थोरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

         कार्यक्रमास विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री अशोक थोरात, पर्यवेक्षक श्री भरत बुरुंगले,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.