विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे : पी.एल.केंडे
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: NMMS -2023 परीक्षेत मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयातील 12 विदयार्थ्यापैकी  8 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेबद्दल विदयालयाचे  माजी विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री.दत्तात्रय सुर्वे ( धावडे) यांनी  यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला.यावेळी  विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे यांनी हे गौरवोद्गार काढले, त्यावेळी ते म्हणाले की, आजचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धा परीक्षेला विदयार्थ्यांनी सामोरे जावे व आपले व्यक्तीमत्व तयार करावे. 
या कार्यक्रमांच्या निमित्ताने दत्तात्रय सुर्वे यांचे  विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे यांच्या शुभहस्ते  शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विदयालयाचे वरिष्ठ शिक्षक एस.डी शेजवळ ,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव एन.एस.कुंभार ,आर.आर.मोरे ,टी.व्ही.शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक व्ही.ए.घोणे यांनी केले तर आभार व्ही.एच.लोहार यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज्य देसाई सचिव डी.एम.शेजवळ तसेच सर्व संचालक मंडळ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आजी-माजी विदयार्थी यांनी सर्व यशस्वी शिष्यवृत्ती प्राप्त विदयार्थ्यांचे अभिनंदन केले