विदयार्थ्यांनी बदलत्या आव्हानांना सामोरे जावे: रविराज देसाई.


पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी या माध्यमिक विदयालयामध्ये इ.10वी विदयार्थ्यांचा शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा हे होते,त्यावेळी ते म्हणाले की,आजचे युग हे डिजिटल ,संगणकाचे युग आहे,विदयार्थ्यांनी बदलत्या आव्हांनाना सामोरे जायला हवे,व्यवसाय शिक्षण घेणे आज काळाची गरज आहे,मोबाईल,आॅनलाईन गेम यापासून विदयार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे ‌व आपले निश्चित ध्येयाप्रत पोहचण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पाहिजेत 

या कार्यक्रमांसाठी युवा नेते आदित्यराज देसाई,माजी जि.प.सदस्य मा.श्री.जे.ए.पाटील,मरळी ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री.राजेंद्र माळी,उपसरपंच मा.श्री.भरत सांळुखे,गव्हाणवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री. दिपक गव्हाणे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमांसाठी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.माने ए.आर.,जे.ए.पाटील,यांनी मनोगते व्यक्त केले,यावेळी विदयार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली,

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे उपशिक्षक श्री.कुंभार सर यांनी केले व आभार श्रीमती जगताप मॅडम यांनी मानले,या कार्यक्रमासाठी मरळी,गव्हाण‌वाडी,चोपदारवाडी,पापर्डे,सुर्यवंशीवाडी गावचे ग्रामस्थ,पालक,विविध संस्थाचे पदाधिकारी,आजी-माजी विदयार्थी उपस्थित होते.