प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन




विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराश्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन या पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामान्यांमधील आदर्श व्यक्ती, संस्था, ट्रस्ट यांना पुरस्काराने सन्मानित करुन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कार सोहळयाचे हे पाचवे वर्ष आहे. याच कार्यक्रमात दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, सॅल्युट कार्ड स्पर्धा यामधील विजेत्यांचांही सन्मान केला जाणार आहे.

डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याशिवाय माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, छत्रपती संभाजीराजे, खा.श्रीनिवास पाटील, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, आ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले, आ.बाळासाहेब पाटील यासह अन्य मान्यवरांनी शुभसंदेश देवून ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला आहे.

तरी सदर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था, ट्रस्ट यांनी आपल्या नामांकनासह आपल्या क्षेत्रातील आपण केलेल्या कार्याचे फोटो, वृत्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे इ. साहित्याचे प्रस्ताव गुरुवार दि.30 मार्च, 2023 पर्यंत डाॅ.संदीप राजाराम डाकवे ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने पाठवावेत. आलेल्या नामांकनामधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कार्थींना एका भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात दिग्ग्ज मान्यवर, सेलिब्रिटी यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------

स्पंदन जीवन गौरव पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान :

अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), पद्मश्री डाॅ.विजय शहा, खा.श्रीनिवास पाटील, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांना स्पंदन जीवन गौरव तर अभिनेत्री अश्विनी महांगडे, लावणीसम्राज्ञी विजया पालव, शिवव्याख्याते प्रा.डाॅ.अरुण घोडके, अभिनेते रवि साळुंखे, अभिनेता सुयश शिर्के, अभिनेत्री सुनंदा शेंडे, उद्योजक सर्जेराव यादव, उद्योजक सुरेश रांजवण यांसह अनेक मान्यवरांना यापूर्वी राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

-------------------------------------------------------------