मोहन पाटील यांना एस .आर .दळवी फाउंडेशन च्या उत्कर्ष शिक्षक " पुरस्काराने सन्मानित.


उंडाळे| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

  काले ता. कराड येथील रहिवासी व चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष , जिल्हा विज्ञान मंडळाचे कोषाध्यक्ष व निरबाडे कनिष्ठ महाविद्यालया चे माजी प्राचार्य मोहन पाटील यांना एस .आर .दळवी फाउंडेशन च्या उत्कर्ष शिक्षक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत. 

 समाजाप्रती करत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन एस . आर . दळवी (आय )फाउंडेशन च्या वतीने उत्कर्ष शिक्षक पुरस्कार सोहळा २०२३ चे रविवार दिनांक १२ फेब्रूवारी रोजी रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षक बँकेच्या प्रशस्त हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते . या पुरस्कार सोहळ्याचे एस आर दळवी फाउंडेशनच्या सीता दळवी आणि त्यांचे पती रामचंद्र दळवी यांच्याद्वारे पुरस्कर सोहळ्याचे आयोजन , नियोजन व संयोजन करण्यात आले होते .

 या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीमती जयश्री तानाजी गायकवाड (अप्पर पोलीस अधीक्षक ) , श्री मोहित कुमार सैनि ( जिल्हा युवा अधिकारी रत्नागिरी ) ,श्री अविनाश लाड ,श्री संतोष कोलते (संस्थापक - कोणते कॉम्प्युटर रत्नागिरी ) , श्री रामचंद्र दळवी व सौ सीता दळवी (संस्थापक एस . आर .दळवी फाउंडेशन (आय ) फाउंडेशनचे डॉ .नयन भेडा (संचालक एस . आर . दळवी (आय ) फाउंडेशन चे पदाधिकारी यांच्या हस्ते *ट्रॉफी , मोबाईल टॅब सन्मान चिन्ह सन्मानपत्र व तुळसीचे रोप देवून सत्कार करण्यात आला प्रसंगी सर्वाच्या उपस्थीत संपन्न* या पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे श्रीमती अल्फा शहा फायनान्शिअल लिटरेसी या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तसेच नेहरू सायन्स सेंटर , मिनिस्टर ऑफ कल्चर , गव्हर्मेंट ऑफ इंडिया व एस . आर . दळवी (आय ) फाउंडेशन द्वारे पूर्ण झालेल्या डिजिटल लिटरेचर चे सन्मानपत्र यावेळी देण्यात आले . हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी एस आर . दळवी . फाउंडेशन चे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या परिश्रमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 

या कार्यक्रमासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून प्राथमिक , माध्यमिक शिक्षकांच्या सह , शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व अधिकारी , सामाजिक जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी , उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर दळवी फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पाकले व सुदेश कदम यांनी केले होते .

 मोहन पाटील सर यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व मान्यवर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक अधिकारी यांच्यासह अगस्त्या फाउंडेशनचे समन्वयक रवींद्र कुलकर्णी अमरजीत चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण सर , चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे पदाधिकारी , रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे पदाधिकारी , विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक , विज्ञान शिक्षक , शिक्षण प्रेमी तसेच विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या छानदार कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सत्कारमूर्ती मोहन पाटील सर यांनी फाउंडेशन ला धन्यवाद दिले आहेत .