पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आजचा विदयार्थी हेच खरे भविष्यातील राष्ट्रांचा आधारस्तंभ आहे,प्रत्येक मुलांला जन्मत:कोणते तरी गुण असतात,त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम विदयालय सतत करत असते,असे मत मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विदयालयाचे माजी मुख्याध्यापक एस.आय. मुजावर यांनी व्यक्त केले.
या विविध गुणदर्शन कार्यक्रमांत मराठी,हिंदी,रिमिक्स गाणी,तसेच महाराष्ट्राची लोकधारा,रेकार्ड डान्स,लावणी अशा विविध प्रकारामधील गाणी विदयालयातील विदयार्थ्यांनी सादर केली,
या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विदयालयाच्या वरीष्ठ शिक्षिका कु.मणेर एस.एस.यांनी केले,तर प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक के.जे.चव्हाण यांनी केले,या कार्यक्रमांसाठी सोनवडे,सुळेवाडी,हुंबरवाडी,शिंदेवाडी,खांडेकरवाडी या गावचे ग्रामस्थ,पालक,आजी-माजी विदयार्थी,विविध संस्थाचे पदाधिकारी,विदयालयातील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ,विदयार्थी,बहुसंख्येने उपस्थित होते, शेवटी या कार्यक्रमाचे आभार उपशिक्षक संतोष कदम यांनी मानले.