न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे विदयालयात बी.आय.एस.क्लबची स्थापना

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या संकल्पनेतून पुणे येथील  केंद्रस्तरावरील नामंकीत कंपनी असलेली बी.आय.एस.क्लबचे हर्ष शुक्ला  (मॅनेजिंग डायरेक्टर पुणे) यांनी बी.आय.एस.क्लबची स्थापना विदयालयामध्ये  नुकतीच केली. यावेळी हर्ष शुक्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, त्यावेळी ते आपल्या मनोगतात म्हणाले की, आज व्यवहारात किराणा माल, इलेक्ट्रीकल वस्तु ते सोन्यापर्यंत वस्तु घेताना ग्राहकांची फसवणुक होते. ही फसवणुक होऊ नये व त्या वस्तु प्रमाणित आहेत की नाही हे कसे ओळखायचे. हे ज्ञान विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी पोहचविण्यासाठी बी.आय.एस.ही केंद्रसरकारची संस्था कार्य करते. ही संस्था विविध वस्तुंचे मानांकन(प्रमाणित) करणारी संस्था आहे असे सांगितले.यावेळी ध्वनीचित्रफीत,तक्त्यांद्वारे माहीती देण्यात आली.     

 यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शेजवळ एस.डी. लोकनेते बाळासाहेब देसाई फौंंडेशनचे सचिव कुंभार एन.एस.,माने डी.बी.,मोरे आर.आर.,शिंदे टी.व्ही,लोहार व्ही.एच.यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव घोणे यांनी केले तर आभार वनिता पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.