वाल्मिक ऋषी तपोभूमी ची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न

 


  ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

     वाल्मिक तपोभूमी हे ठिकाण पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पासून 25 किलोमीटर अंतरावर पठारावर असून वाल्मिक पासून पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चालु होतो या पाणेरी वाल्मिक ठिकाणाला आध्यत्मिक महत्व असून दर वर्षी महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते या दरम्यान आठवडाभर वाल्मिक  पठारावरील मंदिरात रामनाम जप हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

      या दरम्यान अनेक ठिकाणाहून पायी दिंडी येथे दाखल होतात  या ठिकाणी वाल्या कोळ्याने रामनाम जप केल्याने वाल्याचा वाल्मिक ऋषी झाल्याची आख्यायिका रामायणात आहे वाल्या कोळी ज्या काठीने मारून वाटसरूंना लुटत होता त्या काठीला टोनके नांवाने संबोधले जात होते तीच काठी या ठिकाणी पडली व तिला पालवी फुटून त्याचे एक झाड निर्माण झाले या झाडा खाली आज हि भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण होण्या साठी या झाडाखाली दगडाची लगोरी लावतात जेवढी उंच लगोरी तेवढी मनोकामना पूर्ण होते  

      या ठिकाणी एक महादेवाचे छोटे मंदिर असून मंदिराच्या पाठीमागे रांजन असून ज्या वेळी वाल्या कोळी वाटसरूची लूट करायचा त्यावेळी त्या रांजनात एक खडा टाकायचा असे सात रांजन खड्याने भरले होते अशी आख्यायिका आहे याच ठिकाणी एक पाण्याचे कुंड असून ते पाणी प्रवाहित होत ते वांग नदीला जाते असे अध्यात्मिक महत्व असणाऱ्या पाणेरी वाल्मीक येथे महाशिवरात्र दिवशी भाविक भक्त यात्रे साठी मोठी गर्दी करतात.   यावेळी मंदिरात परिसरात भारूड, भजन याने परिसर दुमदुमून निघाला यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्त यांची  सळवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात येत होती तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर वन परिक्षेत्र (वन्यजीव )ढेबेवाडी यांचे वतीने जनजागृती अभियान राबवणेत आले होते तसे फलक लावणेत आले होते.

       यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांच्या बरोबर  यात्रा कमीटी, वाल्मिक देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, युवक वर्ग, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या यात्रे साठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे API अभिजित चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.