पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा हे उपस्थित होते .
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, विदयार्थ्यांनी शोधक वृत्ती जोपासली पाहिजे, निसर्ग ही एक प्रयोगशाळाच आहे, त्यामध्ये सतत बदल होत असतात, त्याचे विदयार्थ्यांनी निरीक्षण केले पाहिजे.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, विदयार्थ्यांनी शोधक वृत्ती जोपासली पाहिजे, निसर्ग ही एक प्रयोगशाळाच आहे, त्यामध्ये सतत बदल होत असतात, त्याचे विदयार्थ्यांनी निरीक्षण केले पाहिजे.
तसेच या विदयालयामध्ये ग्रामीण डोेंगराळ भागातील विदयार्थी शिक्षण घेत असून त्यांनी स्वत:तयार केलेले उपकरणे खूप आदर्शवत होती तसेच आपली जैविवधता जतन केली पाहिजे.
त्याचप्रमाणे विदयार्थ्यांनी रांगोळीतून काढलेल्या विज्ञानाच्या आकृत्या खूप आदर्शवत होत्या. या विदयार्थ्यांना मागर्दर्शन करणारे निसर्गप्रेमी विज्ञान शिक्षक एन.एस.कुंभार यांचा प्रमुख पाहुणे रविराज देसाई यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर स्वागत व्ही.ए.घोणे यांनी केले. तर आभार एस.डी.शेजवळ यांनी मानले, या कार्यक्रमासाठी विदयालयांतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.
हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी मोरणा परिसरातील प्राथमिक शाळा,आजी - माजी विदयार्थी,पालक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली.