ना. शंभूराज देसाई हे समाजाभिमुख नेतृत्व:रविराज देसाई

पानवळवाडी येथील साकव पुलाचे उद्घाटन संपन्न.


पानवळवाडी येथील साकव पुलाचे भूमिपूजन करताना रविराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, सरपंच सौ. गीतांजली काळे, उपसरपंच जोतिराज काळे, ग्रामस्थ व इतर मान्यवर.
कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
नामदार शंभूराज देसाई हे समाजाभिमुख नेतृत्व आहे. पाटण मतदारसंघातील दुर्गम अशा वाडी वस्तीपर्यंत विकासाची कामे पोहच केली आहेत जनतेच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण केलेल्या आहेत त्यासाठी शासनाकडून सर्वाधिक निधी पाटण मतदारसंघात जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मिळवला आहे असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी केले. 26 लाख रुपये निधी मंजूर झालेल्या शिव-ओढयावरील साकल पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण होते. यावेळी सरपंच सौ. गीतांजली काळे, उपसरपंच जोतिराज काळे, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते पानवळवाडी युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना रविराज देसाई म्हणाले मालदन व परिसरातील वाडी वस्तीसाठी नामदार शंभूराज देसाई यांनी कोट्यावधी रुपयाची विकास कामे आणली आहेत. जनतेच्या विकास कामात ते कधीही कमी पडणार नाहीत मात्र आपण सर्व ग्रामस्थ विकासाच्या पाठीशी कायम उभे रहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी डॉ. दिलीपराव चव्हाण म्हणाले पानवळवाडीने नामदार शंभूराज देसाई यांना कायम खंबीरपणे साथ दिली आहे भविष्यातही येथील ग्रामस्थ विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अधिकराव कणसे यांनी केले. यावेळी आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले नामदार देसाई यांनी या वस्तीसाठी अनेक विकासाची कामे केली आहेत. शिव-ओढयावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता याची दखल घेऊन ना. देसाई यांनी तातडीने हा पूल मंजूर केला व या विकास कामाचे नुकतेच भूमिपूजन संपन्न झाले याबद्दल नामदारांचेआभार व्यक्त करतो. याच वाडीतील सभामंडपाचा प्रस्तावही दिला आहे त्याही विकास कामाची मंजुरी लवकर व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी रविराज देसाई यांच्याकडे केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी पन्हाळे यांनी केले तर उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार साबळे यांनी मानले.