कुष्ठरोग आजाराबाबत जनजागृती होणे आवश्यक-श्री.के.जे.चव्हाण.

 


पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा; 

सातारा जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग व ग्रामीण रूग्णालय पाटण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे यांच्या संयुक्त विदयमानाने मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या माध्यमिक विदयालयामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित केलेला होता,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण सर म्हणाले की,कुष्ठरोग आजार हा अनुवांशिक नसून,त्याची लक्षणे सहज ओळखणारी असतात,यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे,तसेच हा आजाराचे निर्मूलन होणे गरजेचे आहे,

यावेळी कुष्ठरोग प्रतिज्ञा यांचे सामूहिक वाचन करण्यात आले,प्राथमिक आरोग्य केेंद्र सोनवडे या केंद्राचे कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री.चोपडे एस.एस. व आरोग्य सहाय्यक श्री.झगडे जी.एन.यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.डोंगरे एस.एल.यांनी केले,यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.