मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तळमावले येथे सामाजिक उपक्रम.


तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थितांशी चर्चा करताना जनविकास पतसंस्थेचे चेअरमन बाळकृष्ण काजारी.
तळमावले |कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

पाटण तालुक्यातील तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जनविकास पतसंस्थेचे चेअरमन बाळकृष्ण काजारी यांच्या वतीने आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी उपतालुका प्रमुख सागर नलवडे, तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी, तानाजी चाळके, सरपंच आत्माराम पाचपुते , सचिन पाटील, नंदकुमार काजारी, उपसरपंच धनाजी चाळके,  राजेंद्र ताईगडे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.