वसंतराव हरूगडे यांचा सेवापूर्ती निमित्त सहपत्निक सत्कार संपन्न.

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

गलमेवाडी ता.पाटण गावचे सुपुत्र आणि जि.प.प्राथ. शाळा शेंडेवाडीचे मुख्याध्यापक व म.रा.प्राथ. शिक्षक संघाचे राज्य सल्लागार नेते श्री. वसंतराव गणपत हरूगडे यांचा सेवापूर्ती निमित्त सहपत्निक सत्कार मौजे गलमेवाडी तालुका पाटण येथे नूकताच संपन्न झाला.

यावेळी डॉ्. दिलीपराव चव्हाण, मा. संजय देसाई माजी शिक्षण सभापती जि. प.सातारा, मा. आर.के.भोसले, माजी सहसचिव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था.कोल्हापूर, मा. महेशजी पालकर साहेब शिक्षण संचालक पुणे अध्यक्ष परीक्षा परिषद पुणे मा. एच.व्हीं.जाधव माजी उपशिक्षणाधिकारी जि.प.सातारा, मा. नितीन जगताप शिक्षण विस्तार अधिकारी ,मा. माधवराव पाटील नेते म.रा.प्राथ. शिक्षक संघ तथा अध्यक्ष अखिल भारतीय प्राथ. शिक्षक महासंघ. सांगली, राजाराम वरुटे मा.अध्यक्ष म. रा.प्राथ. शिक्षक संघ,कोल्हापूर, मा. संभाजीराव बापट कोषाध्यक्ष म. रा.प्राथ. शिक्षक संघ कोल्हापूर, मा. सिद्धेश्वर पुस्तके सातारा , मा. तुकाराम कदम फलटण, मा.पंजाबराव देसाई सदस्य पंचायत समिती पाटण मा. महेंद्र जानुगडे, संचालक सातारा शिक्षक बँक, मा. प्रदीप घाडगे केंद्रप्रमुख, मा. विष्णू मोळावडे केंद्रप्रमुख, मा. सूर्यकांत पवार केंद्रप्रमुख, मा. हणमंतराव काटे केंद्रप्रमुख, सर्व संचालक सातारा बँक, सर्व संचालक कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी. सर्व संचालक पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सह.सोसायटी. सरपंच ग्रामपंचायत गलमेवाडी सर्व ग्रामस्थ, गलमेवाडी, शेंडेवाडी सर्व शिक्षक बंधु भगिनी , महादेव पानवळ, विशाल पवार भैय्या आणि मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते.