सर्पमित्र महादेव पाटील यांनी सर्पाला दिले जीवदान.


कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा

कुंभारगांव ता पाटण येथील संगम हेअर कटिंग सलून दुकानाच्या पाठीमागील ठिकाणी आब्याच्या  झाडाच्या बुडक्याच्या ठिकाणी फरूड जातीचा सर्प निदर्शनास  आला सलुनचे बाबासो शेटे अप्पा यांनी सर्प मित्र महादेव पाटील यांना फोन करून माहिती दिली त्यांनी तात्काळ येऊन त्यांच्या सलून दुकानाच्या पाठीमागे जात त्या फरूड जातीच्या सापाला पकडून आपल्या ताब्यात घेतले  त्या वेळी ते म्हणाले कोणताही सर्प दिसल्यास सर्प मित्र यांचेशी संपर्क साधा सर्पास मारू नका.  या पकडलेल्या सर्पाची नोंद ढेबेवाडी वन विभागामध्ये केली असून सदर सर्पास सुखरूप जंगलात सोडण्यात आले.