महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके  याने हिंदकेसरी किताब पटकावलाय. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळवलाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिजीतने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि तितकीच अभिमानाची बाब आहे. अभिजीत कटके याच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जातोय. अभिजीत मुळचा पुण्याचा असल्याने पुण्यात देखील फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातोय. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना आज खेळला गेला. 

अभिजीत याने या पूर्वी दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्यानंतर त्याने हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.  ______________________________

2017 सालच्या कुस्ती स्पर्धेत मला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर सलग चार वर्षे मेहनत करून मी हा किताब पटकावला आहे. माझ्या प्रशिक्षकांनी सांगितली तशी मी कुस्ती केली, या विजयाने मला खूप आनंद झालाय. हैदराबादहून उद्या पुण्यात पोहोचल्यानंतर तेथे या विजयाचा आनंद साजरा केला जाणार आहे, अशा भावना अभिजीत याने बोलताना व्यक्त केल्या आहेत. 
______________________________
Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज