तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण तालुक्यातील तळमावले येथल शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि उत्तम विद्यार्थी घडवण्याची परंपरा असलेल्या श्री वाल्मिकी विद्यामंदीर मधील १९९६-९७ साली दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्याचा वर्ग २५ वर्षानंतर पुन्हा भरला. यानिमित्त १९९९६-९७ रोजीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, काकासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमांचे पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री वाल्मिकी विद्यामंदीर मधील विद्यार्थ्यांनी सुमधूर असे स्वागत गीत सादर केले.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सद्या आपण काय करत आहे. कोणत्या पदावर कुठे असतो याची ओळख परेड सर्वांसमोर करुन दिली. पंचवीस वर्षांनंतर आपल्या शाळेत एकमेकांना आणि आपल्या शिक्षकांना भेटून सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षिका जुन्या आठवणींना उजाळा देत अगदी रममाण होऊन गेले होते. यावेळी अनेक जुन्या आठवणी नव्याने पल्लवीत झाल्या सरांची व विद्यार्थ्यांचे जणू आठवणींची मैफीलच या कार्यक्रमात रंगली होती. पंचवीस वर्षानंतर काहीजण तर पहिल्यांदाच भेटत असल्याने चेहऱ्यावरून होणारा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

या कार्यक्रमासाठी वाल्मिकी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अशोक माने आणि इतर शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमावेळी माजी मुख्याध्यापक एस.के. कुंभार आणि सध्याचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व माजी शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देवून माजी विद्यार्थी यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमास यावेळी माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी वैशाली साबळे, सविता दोडमणी, स्वाती पाटील, स्वाती कदम, वैशाली काजारी, सुनील इंगवले, सुनील मस्कर, सतीश कुंभार, जगदीश गरूड, संजय कोळेकर, महेश भोसले, अजित माने, संदीप करपे, आनंद करपे, रवी काजारी, अनिल वायचळ, लिवास मुल्ला आणि श्री महेश कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कदम आणि रवी काजारी यानी केले तर श्री अनिल वायचळ यांनी आभार मानले.

____________________________________
कार्याध्यक्षांची भेट 
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यास भेट दिली. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधुन त्यांना भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
____________________________________