श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आ च विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मलकापूर येथे श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आ.च. विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन डॉ. श्रीमती सुनिता पाखले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सौ रेश्मा जाधव म्हणाल्या विद्यार्थ्यांनींनो आज आपण या ठिकाणी आहोत. याचे सर्व श्रेय सावित्रीबाईंना जाते. सावित्रीबाईंच्या वारसदार आपण आहोत याचे भान आपल्याला असले पाहिजे.तसेे सौ पद्मा परियार सौ परवीन बागवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ एस.व्ही.देसाई यांनी केले. आभार एच.एम.मुल्ला यांनी मानले. कार्यक्रमास शेतीमित्र अशोकराव थोरात, डॉ. स्वाती थोरात, मुख्याध्यापिका ए. एस.कुंभार,उप मुख्याध्यापक श्री ए.बी.थोरात, पर्यवेक्षक ब.जी. बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.