कराड उत्तरचे ऋणानुबंध कायम जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

अंतवडी येथे १२ कोटी १४ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ.

कराड उत्तर च्या अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल  निवासराव थोरात यांचा अंतवडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार 




कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: तुमच्यामुळे लोकसभेत मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व आमदार असताना मतदारसंघाचा गौरव वाढविण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे. कराड लोकसभा मतदारसंघातील कराड उत्तरचे जुने ऋणानुबंध कधीही विसरणार नाही. हे ऋणानुबंध कायम जपणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

अंतवडी (ता. कराड) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांची कराड उत्तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल भव्य सत्कार समारंभ व आ. पृथ्वीराज चव्हाण तसेच निवासराव थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १२ कोटी १४ लाख रुपयांच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन, उद्धघटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच मुकुटराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.

कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जेष्ठ नेते मारुतीशेठ जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दिक्षीत, नंदकुमार जगदाळे, कोयना सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भिमराव डांगे, दिपक लिमकर, जे. के. पाटील, कराड उत्तर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, यशवंत चव्हाण,  शिवाजी विद्यापीठ सिनेटचे सदस्य अमित जाधव, शैलेश चव्हाण, उमेश मोहिते, इंद्रजित जाधव, आनंदराव चव्हाण, विजय कदम, लहुराज यादव, दादासाहेब चव्हाण, सतीश इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.



आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड उत्तरमध्ये साखळी बंधारे उभारण्याचे काम माझ्या हातून मुख्यमंत्री असताना झाल्याचे मोठे समाधान वाटते. अंतवडी येथे पाझर तलावासाठी मी मुख्यमंत्री असताना विशेष निधी मंजूर केला होता. विकासकामात श्रेयवादाची लढाई करणे चुकीचे आहे. 

ते म्हणाले, देशात भाजपच्या माध्यमातून द्वेष निर्माण केला जात आहे. बंधुत्व, समता, न्याय, स्वातंत्र्य याला सुरुंग लावायचा. विषमतेच्या वातावरणात देश नेवून पुन्हा वर्णाश्रम पद्धती आणायची चालली आहे. याला आपल्यातील काही माणसे स्वतः च्या स्वार्थासाठी मदत करत आहेत. देशातील अस्थिरतेचे व विषमतेचे वातावरण बदलविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. 

शिवराज मोरे म्हणाले, कराड उत्तरमध्ये कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी नवीन अध्यक्षांनी रात्रीचा दिवस केला पाहिजे. राजीव गांधी यांनी घटना दुरुस्ती केल्याने विकासाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराजबाबांचा आदर्श घ्यावा.

कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात म्हणाले, मसूरच्या पूर्व भागातील शेतीचा कायापालट बंधाऱ्यांच्या माध्यमातून झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त आपलं गावच न बघता पृथ्वीराज बाबांनी कराड उत्तर मध्ये सुद्धा कोट्यवधींचा निधी दिला. बाबांना राजकारणात आदर्श मानूनच माझी राजकारणात वाटचाल चालू आहे. आज देशपातळीवरील विद्वान नेतृत्व आपल्या तालुक्याला जिल्ह्याला लाभलेले आहे यामुळेच समोर येणारा प्रत्येक माणूस हा कोणत्या मतदार संघातील आहे हे न बघता त्याचे काम निसंकोच पणे करणारे दिलदार नेते आमचे असल्याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच कराड उत्तर काँग्रेस च्या अध्यक्ष पदी माझी बाबांनी केलेली निवड सार्थ ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षाचा विचार गावागावात पोहचविण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागून संघटना वाढविण्यावर भर दिला जाईल. 

यावेळी अविनाश नलवडे, भीमराव डांगे, अमित जाधव, उमेश साळुंखे, सतीश इंगवले यांची भाषणे झाली.

शामगावचे नूतन सरपंच विजय पाटोळे व सदस्य, कवठेचे सरपंच लहुराज यादव तसेच योगेश शिंदे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले याबद्दल आ. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी सरपंच शिवाजी शिंदे, हणमंत शिंदे, बाबूराव कुंभार, दिलीप कुंभार, प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. विनोद जाधव यांनी प्रास्ताविक केले. विजय माने व दिपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग झंजे यांनी आभार मानले.