व्हाटसअपच्या माध्यमातून एकत्र येत शाळेला केली मदत.


तळमावले  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सध्या मोबाईल वापरणारे व्हाटसअप वापरत नाही असे लोक अपवादात्मक आढळतील. या व्हाटसअप मधून अनेक चांगली कामे होत असतात. अशाच एका ग्रुपच्या माध्यमातून 1996 च्या दहावीच्या विधार्थ्यांना एकत्र आणण्याची किमया केली धामणी येथील अंकुश सावंत, विनायक पुजारी यांनी. कार्यक्रमासाठी लागणारे सर्वप्रकारचे सर्व नियोजन त्यांनी केले होते.... त्यांना ग्रुपमधील इतरही मुला मुलींनी मदत केली. केवळ एकत्र न येता शाळेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून रु.11,111/- रोख मदत देवून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. 

"क्लासमेंट्स", "आपलं गावं आणि आपली शाळा"  यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल धामणी येथे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक थोरात सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका बी.आर.पाचूपते यांनी केले.  
एच. एल. देसाई, व्ही. पी. देसाई, आवळकर सर, येडगे सर, माजी मुख्याध्यापक थोरात सर, बी.जे. येडगे सर, कांबळी सर, आत्तार सर, जाधव सर, मोरे सर, देशमुख सर, पाटील मॅडम, जानुगडे मॅडम अशा सुमारे 13 माजी शिक्षकांनी या स्नेहसंमेलनासाठी हजेरी लावली होती.
माजी विद्यार्थ्यांमध्ये विनायक पुजारी, अंकुश सावंत, भगवान सावंत, नितीन बोरगे, सचिन देसाई, महेश सावंत, यशवंत येळवे, संपत जाधव, भगवान मस्कर, प्रदीप पाटील, संदिप ज्ञा.पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, दिलीप लोकरे, सचिन मोरे, जनार्धन चव्हाण, अनिल लोकरे, किशोर मोरे, प्रदीप देसाई तर विद्यार्थिंनीमध्ये जयश्री सावंत, शोभा सुपनेकर, हेमा दाभोळकर, वर्षा सावंत, वैशाली पाटील, अलका सावंत, ज्योती सावंत, सुनीता सावंत, रंजना लकडे, पुष्पा चव्हाण, मनीषा सावंत, मनीषा गायकवाड, रोहिणी लोकरे, रेखा थोरात उपस्थित होते.
1996 च्या दहावीच्या या बॅचने शाळेला यातून फुल ना फुलाची पाकळी म्हणून रु.11,111/- एवढी देणगी दिली. दरम्यान या बॅचमधील दिलीप लोकरे यांची मुलगी ऋतुजा दिलीप लोकरे हिने पश्चिम बंगाल येथे झालेल्या कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते म्हणून तिचा सत्कार धामणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ तसेच 1996 च्या बॅचच्यावतीने करण्यात आला.
यावेळी सरपंच आशाताई नेर्लेकर, सदस्य शीतल संदीप पाटील, माजी सरपंच सुंदर पुजारी, माजी उपसरपंच नानासाहेब सावंत, शामराव पुजारी सर, आनंदा नायकवडी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.एस.महाडिक सर आणि एस.आर.काळे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन ठगाले सर यांनी केले.
चौकटीत : 
26 वर्षा नंतर कुणीही कुणाच्या संपर्कात नव्हते. सन 2015 साली अंकुश सावंत यांनी व्हाट्स अँप वरती ‘क्लासमेट्स’नावाचा फक्त मुलांचा ग्रुप बनवून ‘न्यू इंग्लिश स्कूल धामणी मधील मुलांसाठी साठी पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.