‘शिवसमर्थ’ च्या वतीने पत्रकारांचा सन्मान


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढेबेवाडी परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ऍड. जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, नानासाहेब सावंत, देवबा वायचळ सर, विजय कुंभार व संस्थेचे अन्य अधिकारी, इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.

 प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार पोपट माने, अमित शिंदे, हरीष पेंढारकर, प्रदीप माने, विजय सुतार, डॉ.संदीप डाकवे या पत्रकारांचा व डीटीपी ऑपरेटर हणमंत मोळावडे यांचा संस्थेच्या व परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, दिनदर्शिका देवून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी पत्रकार डॉ.संदीप डाकवे, अमित शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक व सुत्रसंचालन रविंद्र पाटील तर आभार प्रदर्शन जयकर साठे यांनी केले.