सावित्रीबाई फुले यांचे कार्य आदर्शवत : श्री.के.जे.चव्हाण


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली, या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री के.जे.चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, सावित्रीबाईनी स्वत:शिक्षण घेवून त्या साक्षर झाल्या,व मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे हा त्यांचा उद्देश होता,त्यामुळे त्यांनी मुलींसाठी पुणे या ठिकाणी पहिली शाळा काढली, खरोखरच फुले कुटूबियांचे कार्य खूप आदर्शवत आहे, आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे,असे मत श्री.के.जे.चव्हाण सर यांनी मानले.

         यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण सर यांचे शुभहस्ते इ.9वी च्या वर्गाच्या वतीने तयार केलेल्या "ज्ञानाई"या हस्तलिखिताचे प्रकाशन  झाले, तसेच या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निंबध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धामधील यशस्वी  स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमांनिमित्त श्री.पी.एल.उदुगडे, श्री.ए.के.जाधव, श्री.जे.एस.मदने, कु.एस.एस.मणेर व विदयार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर स्वागत सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.संतोष कदम यांनी केले, तर सुत्रसंचालन कु.शिवानी शेजवळ या विदयार्थिनीने केलेbव आभार श्री.एस.एल.डोंगरे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विदयार्थी उपस्थित होते.