श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे योग प्रशिक्षण उत्साहात साजरे.



कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजेबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी योग करणे ही सुध्दा माणसाची गरज बनली आहे असे प्रतिपादन योग प्रशिक्षक श्री महालिंग मुंढेकर यांनी केले.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे योग प्रशिक्षण उत्साहात साजरे करण्यात आले.
 सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे विसरून चालला आहे परंतु विद्यार्थ्यांना त्याच्या उज्वल भविष्यासाठी अभ्यासाबरोबर आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी एक दिवशीय योग प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमावेळी महालिंग मुंढेकर यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रियंका आलेकरी यांनी केले तर आभार दीप्ती पाटील यांनी मानले.