येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.


येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार असे एकदिवसीय शिबीर संपन्न.

येळगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोजी श्री:त्वक हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ ले.कर्नल डॉ प्रदीप पाटील व शिवछत्रपती प्रतिष्ठान, येळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नेहरू युवा मंडळ, येळगाव यांच्या सहकार्याने मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार असे एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १५० रुग्णांनी लाभ घेतला. 

ग्रामीण भागातील लोकांना त्वचा रोगावरील उपचार विनामूल्य मिळावेत हा या शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे डॉ.पाटील म्हणाले. मागील काही महिन्यात आपण प्राथमिक आरोग्य केंद्र येळगाव आणि गोटेवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याला ही उदंड प्रतिसाद मिळाला. यावरून हे स्पष्ट होते की या दूर्गम भागातील लोकांना त्वचा रोगाच्या समस्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून भविष्यात अजून जास्तीत जास्त शिबीरे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. 



हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत शेवाळे,झुंजार पाटील, दिलीप नायकवडी, आकाराम शेटे, नेहरू युवा मंडळाचे पंकज पाटील, आनंद पाटील (इलु), आदित्य पाटील, संदीप नायकवडी, अमित पाटील, महादेव पाटील, बाजीराव पाटील, अरविंद शेवाळे, विशाल पेटकर,साहिल नायकवडी, प्रतीक कदम, रामचंद्र पाटील, रघुनाथ पाटील,आनंदा शेवाळे इत्यादींचे बहुमोल सहकार्य लाभले.