माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप

 

नवीमुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी कॉलेज जीवनापासूनच माथाडी कामगार चळवळीत जिवापाड मेहनत घेऊन काम केले आहे. दुचाकीवरुन प्रवास करुन माथाडी कामगारांच्या समस्या ते तत्पर सोडवित असत, आजही ते माथाडी कामगारांच्या सेवेसाठी अहोरात्र उपलब्ध असतात. माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविणे हेच त्यांचे एकमेव उदिष्ट आहे, त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना खंबीर पाठीबा देऊन नेहमीच सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी माथाडी भवन,वाशी,नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळयात गुलाबराव जगताप बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या संघटनेला अधिक बलाढय व गतीमान करण्याचे तसेच त्यांनी केलेल्या एतिहासिक कार्याची जपणूक करण्याचे काम कै.शिवाजीराव पाटील, कै.संभाजीराव पाटील यांनी संघटनेचे तत्कालीन सरचिटणीस म्हणून केले. या दोघांच्या निधनानंतर नरेंद्र पाटील यांनी सरचिटणीस या प्रमुख पदावर धाडसी नेतृत्व करुन संघटनेला उत्तरोत्तर अधिक बलवान केली आहे. माथाडी कामगारांसाठी त्यांनी अहोरात्र झटून कामगांरावर आलेली संकटे न डगमगता परतविली आहेत. तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. आता तर ते अण्णासाहेब पाटील आथक मागास विकास महामंडळाचे दुसऱ्या वेळी अध्यक्ष झाले असून, त्यांनी महाराष्ट्रात अनेक तरुणांना उदयोजक बनविले आणि आज ही ते अधिक क्षमतेने तरुण उदयोजक निर्माण करण्याचे काम करीत आहेत. एक लाख उदयोजक निर्माण करण्याचे त्याचे उदिष्ट आहे. म्हणून मी आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माथाडी कामगारांचे, संघटनेचे तसेच महामंडळाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी दिर्घायुष्य लाभावे. त्यांची ख्याती दुरवर पसरावी अशा शुभेच्छा देतो.  

यानंतर बोलताना माजी खासदार संजिवजी नाईक म्हणाले की, नरेंद्र पाटील हे आमचे जिवाभावाचे मित्र असून, गेली कित्येक वर्षे मी त्यांचे काम जवळून पाहतोय. अथक परिश्रम, धाडसी वृत्ती, अचुक निर्णय क्षमता असे अनेक गुण त्यांच्याकडे आहेत. म्हणून आज ते अनेक क्षेत्रांमध्ये आपली जबाबदारी अत्यंत कौशल्याने पेलत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्य यापुर्वी ठप्प पडले होते, या महामंडळाची जबाबदारी सरकारने त्यांच्यावर सोपविल्यानंतर त्यांनी महामंडळाला गतिमान करुन हजारो तरुणांना उदयोजक केले म्हणून आजच्या अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त मी त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. 

तर संघटनेच्या कायदेशीर सल्लागार भारतीताई पाटील  आपल्या बंधुना शुभेच्छा देताना म्हणाल्या की, आमचा भाऊ असून सुध्दा आमच्या बरोबर बोलण्यासाठी त्याला वेळही नाही. क्वचित प्रसंगी संघटनेच्या कार्यालयात भेट होते अथवा तसेच काय असेल तर फोनवरुन दोनच वाक्यात बोलतो. संघटना, राजकारण, समाजकारण यातचं त्यांच जिवनमान व्यस्त असत. माझ्या भावाच्या आजच्या वाढदिवसानिमित्त मी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करते.

 या आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, जिवनात अनेक ताण-तणाव असतात, या सगळयांसोबत संघर्ष करुनच जिवन जगायचे असते आणि आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीची कामे पार पाडायची असतात या तत्वाला अनुसरुनच मी गेले अनेक वर्षांपासून माझे कर्तव्य पार पाडीत आहे. स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी उभी केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ व मराठा समाजाची चळवळ पुढे नेहण्यासाठी मी सदैव कार्यतत्पर राहणार आहे. आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रविवार असुनही आपण सर्व मान्यवर आणि माझे माथाडी कामगार बंधु-भगिनी हितचिंतक मराठा व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.

 यावेळी भाजपा नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, युनियनचे संयुक्त सरचिटणीस व माजी नगरसेवक, चंद्रकांत पाटील, बिडचे रवि शिंदे, सोलापुरचे किरण पवार,औरंगाबादचे लक्ष्मण नवले, सांगलीचे महेश माने तसेच माथाडी कामगार कार्यकर्ते सर्वश्री पांडुरंग धोंडे, संतोष कोंढाळकर, अनिल संकपाळ, संतोष अहिरे, बबनराव संकपाळ आदि कार्यकत्यांची शुभेच्छापर भाषणे झाली.

 या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन व सुत्रसंचालन युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी हजारो माथाडी कामगार, कार्यकर्ते, मराठा समाजाचे पदाधिकारी, हितचिंतक, पालावाला महिला व कार्यकर्त्या तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर संस्थांचे पदाधिकारी, माजी आमदार संदिपजी नाईक, नवी मुंबईच्या शुभांगी पाटील, संदिप म्हात्रे, डी.आर.पाटील, सुनिल म्हस्कर, कृष्णा पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संतोष बर्गे, मिनांक्षी देशमुख, शिवानी देशमुख, सचिन शिंदे, पराग मुंबरकर,शाम ढमाले आणि महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.