श्री संतकृपा शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

डॉ. उषा जोहरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.

घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी प्रसून जोहरी यांची विशेष उपस्थिती होती. 

यावेळी श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ, डी फार्मसी च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. पुष्पा पाटील, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ.सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 यावेळी ध्वजवंदना नंतर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी झेंड्यास मानवंदना देऊन शानदार संचलन केले. फार्मसीच्या व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. 

 


यावेळी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.अनुजा कुंभार व कु.अक्षदा बेंगडे यांनी महाराष्ट्र स्टेट ब्रँच आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे या त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ.उषा जोहरी यांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विविध महाविद्यालयातील दालनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. डी फार्मसी महाविद्यालयात संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा जोहरी यांच्या हस्ते औषधी वनस्पती प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध औषधी वनस्पती ची माहिती मान्यवरांनी घेतली. 

तसेच यावेळी मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेचे उदघाटन श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रोफेसर महादेवलाल श्रॉफ नामकरण केलेल्या सेमिनार हॉलचे उदघाटन बी फार्मसी महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले 

तसेच बी फार्मसी महाविद्यालयाच्या जिमखाना बोर्डचे व जडधातू परीक्षण लॅब चे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.उषा जोहरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले तसेच येथील रांगोळी स्पर्धेचे उदघाटन ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. पुष्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थिनींनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या पाहून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले तसेच इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इंनक्युबेशन सेंटरचे उदघाटन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. सुप्रिया पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी इंनक्युबेशन सेंटरची पाहणी करून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. 

प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सुनिता सुतार यांनी केले.