मर्चंट सिंडिकेट पतसंस्थेत प्रजासत्ताक दिनानिमत्त वाहन वितरण संपन्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट पतसंस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जेष्ठ संचालक श्री. शिवराम पवार (मामा) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 या वेळी संस्थचे संस्थापक अनिल शिंदे(साहेब), चेअरमन मा.श्री. ज्ञानदेव जाधव(नाना) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी प्रजासत्ताक दिनानिमत्त वाहन वितरण करण्यात आले. या वेळी श्री. सुहास खाशाबा पाटील यांना maruti suzuki ertiga या वाहनाचे वितरण उपव्यवस्थापक श्री.शरद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सर्जेराव नलवडे, संचालक डॉ. चंद्रकांत बोत्रे, सुरेश देसाई, शिवाजी देसाई, जितेंद्र कोळेकर, बाबासो जाधव, संचालिका सौ.कल्पना जाधव, सल्लागार डॉ. सुभाष ताईगडे, शांताराम जाधव, बाळासाहेब कचरे, आनंद माने(शेठ), पोलीस पाटील विशाल कोळेकर, हणमंत ताईगडे, तानाजी शिंदे, उत्तम ढेब, प्रसाद नलवडे, कांतीदास तिकुडवे, ओंकार शिंदे व इतर मान्यवर तसेच संस्थेचे व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर संस्थेच सर्व सेवक उपस्थित होते.