कराड उत्तर काँग्रेस अध्यक्षपदी निवास थोरात


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासारख्या एका युवा चेहऱ्याला कराड उत्तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात निवास थोरात यांना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक,  अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष झाकीर पठाण, अजितराव पाटील, हेमंत जाधव, उमेश मोहिते, प्रवीण वेताळ, अजित पवार, अमित जाधव आदींच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

निवास थोरात हे स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. नडशी सारख्या छोट्याशा गावातील असून सुद्धा युवकांचे संघटन व स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले घडलेले युवा नेतृत्व असल्याची लोकभावना या भागात आहे यामुळेच पहिल्याच प्रयत्नात ज़िल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले आहेत. अशा युवा नेतृत्वास अध्यक्ष पदाची ताकद दिल्यामुळे कराड उत्तर मध्ये काँग्रेस संघटन मजबूत होईल या उद्देशाने ही निवड झाल्याचे मानले जात आहे.