कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार


कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कुंभारगांव ता पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील 1 ली ते 4 थी च्या विध्यार्त्याकडून शाळेच्या क्रिडांगणावर बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. 

या वेळी कुंभारगांव सरपंच सौ. सारिका पाटणकर, ग्रामपंचायत सदस्या, शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला चव्हाण, सौ. माधुरी पाटील ,अनुराधा माने , अंगणवाडी सेविका, विद्यार्थी उपस्थित होते. 

या शाळेतील बालकानी भरवलेल्या बाजारात हजारो रुपयांची उलाढाल झाली यातून विध्यार्त्याना उपयुक्त व्यवहार ज्ञान मिळेल व या अनुभवाचा निश्चित फायदा भविष्यात विध्यार्त्याना होईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.