रोटरी क्लब ऑफ मलकापूर तर्फे मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व उपचार शिबीर.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मलकापूरने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत  रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांचेतर्फे मोफत भव्य आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व उपचार शिबीर आयोजित केले आहे.

या शिबीरामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, पायातून मुंग्या येणे, टाच दुखणे, मानदुखी यांसारख्या वातविकारांवर उपचार केले जातील.महिलांसाठी आरोग्य विषयी समस्यांवर तपासणी व उपचार केले जातील तसेच प्रकृतीनुसार आहारविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.

सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जि.प.कॉलनी, सुमन मेडिकलच्या पाठीमागे, आगाशिवनगर-मलकापूर ता. कराड. येथे करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी डॉ. अमोल मोटे, डॉ. सारिका गावडे, डॉ. सुषमा मोटे हे तज्ञ डॉक्टर उपस्थित असणार आहेत.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष रो. अरुण यादव, सेक्रेटरी रो. राजन वेळापुरे, रो. डॉ. संतोष जाधव, रो. विनोद आमले, रो. राहूल जमादार व रो. सलीमभाई मुजावर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

___________________________________
26 जानेवारी निमित्त रोटरी क्लब ऑफ मलकापूरने मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन व उपचार शिबिर आयोजित केले आहे. गुरुवार दि. २६ व २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत शिबिराचे आयोजन केले आहे. या मध्ये तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.
रो. अरुण यादव 
अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ मलकापूर
___________________________________