नेता असावा असा...

पत्रकार परिषद चालू असताना यूवा नेते चंद्रकांत चाळके यांना ना.शंभूराज देसाई यांनी दिला सन्मान..कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यकर्त्या प्रति असणारे प्रेम एका पत्रकार परिषदेतून दिसून आले.

त्याचे झाले असे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर मुंबई येथे पत्रकार परिषद चालू होती यावेळी ना. शंभूराज देसाई, इतर मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी होती. यावेळी कुंभारगाव विभागाचे युवा नेते व बाळासाहेबांची शिवसेनेचे ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख चंद्रकांत चाळके हे देखील तिथे उपस्थित होते पण कार्यकर्त्यांची अलोट गर्दी असल्यामुळे ते मागील बाजूस उभे होते.

पत्रकार परिषद चालू असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत चाळके यांना पाहिले व त्या क्षणी त्यांना हाक मारून बोलावून घेतले व आपल्या शेजारी थांबण्यास सांगितले. तिथे उपस्थित असणारे कार्यकर्तेही या प्रसंगाने भारावून गेले व 'नेता असावा तर असा' अशी प्रतिक्रिया त्यांच्यामध्ये ऐकण्यास मिळाली.

 नामदार देसाई हे आपल्या कार्यकर्त्यांशी नेहमीच संपर्कात असतात त्यांना योग्य तो सन्मान देतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. व "नेता असावा तर असा" अशा प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत.

कोण आहेत चंद्रकांत चाळके ?

• चंद्रकांत चाळके हे पाटण तालुक्यातील चाळकेवाडी कुंभारगावचे सुपुत्र.

• मुंबई येथील साईराज सहकारी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन.

• सहकार, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य.

• चाळकेवाडी ग्रामपंचायतीत निर्विवाद वर्चस्व.युवकांचे प्रेरणास्थान व आयडॉल.

• नामदार देसाई यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.

 • तसेच त्यांचे संघटन कौशल्य व कुंभारगाव विभाग व मुंबई येथे असणारा जनसंपर्क खूप मोठा आहे.

 • काही दिवसांपूर्वीच त्यांची बाळासाहेबाची शिवसेनेचे ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख म्हणून निवड झाली आहे. 

• तसेच ते साईराज परिवाराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून साईराज परिवारातर्फे विविध सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.