काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले ता पाटण येथे स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्ताने क्रीडा विभागा अंतर्गत वार्षिक क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र ताईगडे (उपसरपंच, तळमावले ग्रामपंचायत) यांच्या शुभहस्ते क्रिडा करण्यात आले. यावेळी मयुर साळुंखे (सदस्य ,तळमावले ग्रामपंचायत), संजय भुलूगडे (माजी उपसरपंच, तळमावले ), प्राचार्य डॉ अरूण गाडे , प्रा डॉ विक्रांत सुपूगडे (शारीरिक शिक्षण संचालक ) इ.उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे व मान्यवर मंडळीचे स्वागत व सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांच्या शुभहस्ते  गुलाबपुष्प आणि झेप अंक देऊन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सचिन पुजारी यांनी केले, आभार प्रा डॉ विक्रांत सुपूगडे यांनी मानले. या वार्षिक क्रीडा स्पर्धेसाठी सर्वच गुरूदेव कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले व क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी देखील खिळाडु वृत्तीने जय - पराजय स्वीकार करून स्पर्धा यशस्वी पार पाडल्या. 

 या स्पर्धेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विशेष परिश्रम घेतले.