पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चाफळ येथील समर्थ विदयालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ - धावडे विद्यालयाने तयार केलेल्या उपकरणाचे पाटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांच्यासह मान्यवरांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाने तयार केलेल्या उपकरणाचे तोंडभरून कौतुक केले.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, विदयार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासणे आवश्यक आहे, थोर वैज्ञानिकांच्या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे, तसेच विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत विदयालयातील विदयार्थ्यांचे तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी विदयालयाचे विज्ञान शिक्षक व माजी पंचायत समिती सदस्य एस. एन. कुंभार व टी.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी विद्यूत उपकरण तयार केले होते. विजेची जास्तीत जास्त बचत कशी करता येईल या उद्देशाने हे उपकरण तयार करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी बोरकर मॅडम यांनी सदर उपकरणाचे स्वीच आॅन व आॅफ करून प्रत्यक्ष पाहणी केली. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यश मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई , सचिव डी.एम.शेजवळ ,सर्व संचालक लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, युवा नेते जयराज देसाई, विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे , सर्व शिक्षकवृंद, आजी माजी विदयार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.