रक्तदात्यांचा उत्स्फुर्त उच्चांकी प्रतिसाद हेच श्री मळाई ग्रुपचे यश : शेती मित्र अशोकराव थोरात


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: सामाजिक बांधिलकी हा ध्यास घेऊन काम करताना समाजाची बांधिलकी ओळखून श्री मळाई देवी शिक्षण संस्था, श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था व विज्ञान प्रबोधिनी कराड यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श ज्युनिअर कॉलेज व आ.च.विद्यालय, मलकापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी बोलताना शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले, की ग्रुपने उच्चांकी रक्तदानाचा संकल्प केला होता.रक्तदात्यांनी उत्स्फुर्त रक्तदान केल्याने आमचा संकल्प पूर्ण झाला. असे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गेली दहा वर्षापासून मळाई ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.असेही त्यांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोक विविध प्रकारच्या व्याधींनी त्रस्त झालेले आहेत, कोरोना,डेंग्यू, कॉलरा, मलेरिया या व यासारखे महाभयंकर आजार व अपघातांना बळी पडत आहेत अशा पीडितांना रक्ताची नितांत आवश्यकता असते. परंतु त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होत नाही. प्रसंगी रूग्णांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यासाठी या सारखी शिबिरे समाजात आयोजित करून समाजोपयोगी कामे करून समाजात आदर्श निर्माण करावा.

     याप्रसंगी रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. डॉ संदीप यादव , श्रीमती विना ढापरे यांचे शुभहस्ते व मा. अशोकराव थोरात, डॉ. स्वाती थोरात, डॉ विजय माने,मलकापूरचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, भीमराव माऊर श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ.अरुणादेवी पाटील, आबासो सोळवंडे आण्णासो काशीद ,भरत जंत्रे,प्रशांत गावडे, राजू मुल्ला, मलकापूरचे नगरसेवक दिनेश रैनाक,संस्थेचे अध्यक्ष पी.जी.पाटील, उपाध्यक्ष श्री.बी.बी.पाटील, संचालक वसंतराव चव्हाण,प्रा. संजय थोरात, मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार , उपमुख्याध्यापक ए.बी.थोरात,पर्यवेक्षक बी.जी. बुरुंगले, प्रा.सौ.शिला पाटील, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, मान्यवर रक्तदाते ग्रामस्थ, शिक्षक बंधू भगिनी यांचे उपस्थित संपन्न झाले.

       कार्यक्रमास कराडचे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शिबिर आयोजनाबद्दल स्वाती थोरात यांना धन्यवाद दिले, त्यांचे कौतुक केले. तसेच मा. उदय दादा पाटील यांनीही शिबिरास सदिच्छा भेट देऊन उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

     रक्तदान शिबिर संयोजीका डॉ.स्वाती थोरात यांनी रक्ताची आवश्यकता, फायदे, रक्तदान का करावे ? याबाबत उपस्थित रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. तसेच मळाई ग्रुपच्या माध्यमातून सलग पाच वर्षे रक्तदान करणाऱ्या 60 रक्तदात्यांना शिल्ड देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आल्याचे संयोजिका डॉक्टर सौ स्वाती थोरात यांनी सांगितले.

       रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महालक्ष्मी ब्लड बँक कराडच्या व्यवस्थापक श्रीमती वीणा ढापरे, डॉ.आबा गोरड, टेक्निशियन अंकिता कापूरकर, प्रथमेश कापूरकर, चैत्राली जाधव, ऋतुजा पाटील, रसिका कोकरे, अस्मिता नेहलकर, वर्षा वाघमारे, ज्योती जाधव, निखिल हरोले, राहुल गडदे ,गणेश खोत, सतीश शिंगाडे, कीर्ती डोईफोडे तसेच यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड प्रमुख डॉ. विवेक चव्हाण त्यांचे सहकारी सुपरवायझर दीपक कदम, डॉ.संध्या पाखले, टेक्निशियन विश्वजीत साळुंखे, रोहित सूर्यवंशी कुंडलिक यादव, वृषाली नरोटे, स्वप्नाली पवार, सचिन कुंभार यांचे सहकार्य लाभले. तसेच विज्ञान प्रबोधिनीचे सचिव महेश सावंत, शेखर शिर्के, प्रकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

         रक्तदान शिबिर सकाळी 9,00 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत सुरू होते. समाजातील अनेक रक्तदात्यांनी , जागरूक नागरिकांनी तसेच माजी विद्यार्थ्यी, पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरामध्ये 328 रक्तदात्यांनी रक्तदान करून मळाई ग्रुपचा रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला. डॉ.स्वाती थोरात यांनी सर्व रक्तदात्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

       सदर शिबीर यशस्वितेसाठी डॉ.स्वाती थोरात, मळाई ग्रूप सर्व सदस्य,विज्ञान प्रबोधिनी सदस्य,संस्थेच्या सर्व शाखांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पतसंस्थेतील सर्व कर्मचारी राष्ट्रीय छात्रसेनेचे सर्व कॅडेट, संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले.

             रक्तदान शिबिरास उपस्थित असणाऱ्या रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री पर्यवेक्षक बी.जी.बुरुंगले यांनी मानले.