श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेत, संस्थांतर्गत कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व आदर्श क्रीडा संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थांतर्गत कॅरम स्पर्धा नुकत्याच आ. च. विद्यालय, मलकापूर येथे संपन्न झाल्या. या कॅरम स्पर्धेचे उद्घाटन वाहतूक नियंत्रण शाखा कराडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मा.मनोज अंकुश शिंदे

व सेवा निवृत्ती बँक अधिकारी मा.श्री संजय महादेव गरुड पाटील यांच्या हस्ते झाले.

           स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे सचिव शेतीमित्र श्री अशोकराव थोरात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण, प्रमुख पाहुणे, मलकापूरचे पोलीस पाटील प्रशांत गावडे , माजी विद्यार्थी श्री शिवाजीराव लक्ष्मण पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. 

           यावेळी संस्थेचे सचिव श्री अशोकराव थोरात यांनी स्पर्धकांना जीवनातील खेळाचे महत्व सांगून, अनेक गोष्टी खेळामुळे प्राप्त होतात असे सांगितले.तसेच संचालक श्री वसंतराव चव्हाण यांनी खेळामुळे आरोग्य चांगले राहते तसेच कॅरम मुळे बुद्धीला चालना मिळते हे पटवून दिले. प्रशांत गावडे यांनी परिस्थितीमुळे खेळू न शकणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तर श्री शिवाजीराव लक्ष्मण पवार यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शाळेत होतो. त्यासाठी आपण शाळेत प्रामाणिक असायला पाहिजे असे सांगितले.

        प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाश बर्गे, निवास बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा कुंभार, उप मुख्याध्यापक श्री ए.बी.थोरात, पर्यवेक्षक श्री बी.जी. बुरुंगले तसेच विद्यालयाचे क्रीडा प्रमुख श्री जे.एन. कराळे, संयोजिका सौ.यु. ए.थोरात, तसेच संस्थेतील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा कुंभार यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार क्रीडाशिक्षक श्री हेमंत शिर्के यांनी मानले.