सुरज पडवळ यांची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड.

 


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2021-2022 घेण्यात आलेल्या परीक्षेत(STI) राज्य विक्री कर निरीक्षक पदी येरफळे या गावचे सुपुत्र अरविंद विष्णु पडवळ यांचे चिरंजीव सुरज उर्फ सनी अरविंद पडवळ याची निवड झाली.

अरविंद पडवळ हे माध्यमिक शिक्षक असून त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले व आपल्या मुलांच्या समोर एक आदर्श व्यक्तिमत्व उभे केले संस्कार व अभ्यासू बाणा आपल्या मुलांच्यात त्यांनी रूजवला व त्याच वाटेवरचे पुढचे पाऊल टाकत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या(STI) राज्य विक्री कर निरीक्षक पदी सुरज  यानें अभिमानस्पद कामगिरी केलेली आहे,या देदिप्यमान यशाबद्दल येरफळे गावच्या वतीने सूरजचा जाहिर सत्कार करण्यात आला त्यावेळी येरफळे गावचे सरपंच अनिल भिसे, बाळकृष्ण भिसे, पांडूरंग पाटील, संतोष कदम , नथुराम पडवळ गुरूजी, सतीश पाटील ,पंढरीनाथ पाटील, राजेंद्र पाटील, के.पी.पडवळ, बंडू कदम, सोमनाथ पवार, अशोक पाटील, विठ्ठल निकम, अमर निकम, श्रीरंग निकम, सुनिल पडवळ, बाजीराव पडवळ, शंकर पडवळ, तानाजी पडवळ, राहूल पाटील हे यावेळी उपस्थित होते. संपूर्ण गावातून सूरजने मिळविलेल्या यशाबद्दल मिरवणूक तसेच फटाक्याची आतिषबाजीही करण्यात आली.