श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील मॅडम उपस्थित होत्या.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या तिन मूलभूत गरजा बरोबर औषध ही सुद्धा मूलभूत गरज असल्याचे सांगितले. तसेच परीक्षेला तोंड देण्यासाठी वेळेचे फार मोठे नियोजन असायला हवे, अभ्यासात सातत्य तसेच आपली इतरांबरोबरची संगत कशी असावी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी फार्मसी विभागांमध्ये कशा प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ते सांगितले. तसेच मानवाला जीवदान देणारे औषध आपण तयार करत आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी औषध निर्मितीसाठी आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने व प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका कदम, विश्वजीत साठे, अक्षदा बेंगडे, निशा धाष्टे यांनी केले. तर आभार प्रा. प्रियांका आलेकरी यांनी मानले.