मर्चंट सिंडिकेटने सहकारातील पारदर्शक कारभारामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली : अनिल शिंदे

दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संप.न्नतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती क्रेडिट पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही चांगले काम करत तळमावले, ढेबेवाडी परिसरात ओळख निर्माण केली आहे. संस्था यावर्षीची दिनदर्शिका काढून सभासदांपर्यंत पोहचवत आहे. असे प्रतिपादन मर्चंट सिंडिकेटचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे यांनी केले.

संस्थेच्या तळमावले, ता. पाटण येथील शाखेत दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चेअरमन ज्ञानदेव जाधव, व्हाईस चेअरमन सर्जेराव नलवडे, संचालक डॉ. चंद्रकांत बोत्रे, राजेश करपे, अनिल माने, शिवाजी देसाई, सुरेश देसाई, लक्ष्मण मत्रे, सल्लागार प्रशांत पोतदार, महेश कोकाटे, उमेश भूलूगडे, भीमराव जाधव, रामदास पवार, हणमंत ताईगडे, संजय भुलूगडे, सागर नलवडे, अविनाश मोहिते, रघुनाथ कुंभार,   अधिकराव तडाखे, ओंकार शिंदे, व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर उपव्यवस्थापक शरद शिंदे, शाखा प्रमुख सौ. सविता सपकाळ, सेवक सुहास इंगळे, अनिकेत नलवडे यांची उपस्थिती होती.

दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने तळमावले गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी निवड झालेले सूरज यादव, कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या संचालकपदी सौ. वैशाली पवार, साईंगडे ग्रामपंचायती सदस्यपदी गणेश यादव, तळमावलेच्या सदस्यपदी सुहास गुजर यांची निवड झाल्याबद्दल अनिल शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.