नवी मुंबई येथे पालकमंत्री चषक 2023चे बाळकृष्ण काजारी यांच्या हस्ते शुभारंभ.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी बाळकृष्ण काजारी यांचे तर्फे प्रथम पारितोषिक जाहीर.नवी मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांची काही दिवसांपूर्वी सातारा व ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाली आहे.

पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पालकमंत्री चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.पाटण तालुक्यातील विविध गावातील खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला आहे.

पालकमंत्री चषक 2023 साठी जनविकास सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. सरपंच बाळकृष्ण काजारी यांनी रुपये ₹.30,000 चे प्रथम पारितोषिक जाहीर केले आहे.

सदर क्रिकेट स्पर्धेचा बाळकृष्ण काजारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यांनी जाहीर केलेल्या पारितोषिकाबद्दल तसेच खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. 

यावेळी उपस्थित खेळाडूंनी व क्रिकेट प्रेमींनी बाळकृष्ण काजारी यांचे विशेष अभिनंदन केले.