आजी माजी BSF सैनिकांचा 35 वर्षांनी स्नेह मेळावा


मौजे जेजुरी येथे 1987 ट्रेंनिग बॅच मधील आजी माजी BSF जवानांचा एकत्र येत स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला या वेळी या आयोजनाचे अध्यक्ष पी.आर गायकवाड व सर्व जवान यांनी एकत्र येत STC BSF बेंगलोर ऐहलंका येथील ट्रेंनिग सेंटर येथील आठवणींना उजाळा देत जे देशासाठी शाहिद सैनिक झाले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहत कार्यक्रमाला सुरुवात केली

      प्रत्येक भारतीय बोर्डरमेन सैनिक प्रेमाने भरलेला आहे. ती शौर्याची खरी मूर्ती आहे. धैर्य आणि त्याग त्यांच्या रक्तात आहे. तो देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईकांपासून दूर निघून जातो. खरोखर, आपल्या भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या बोर्डरमेन सैनिकांमुळे शत्रू देशाकडे डोळा वर करूनही पाहू शकत नाही. सत्य हे आहे की भारतीय बोर्डरमेन सैनिक त्याच्या उत्कृष्ट गुणांनी जगभर प्रसिद्ध आहे. 

             या सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्ष पी आर गायकवाड, अशोक कोळसे,जयवंत पाटील,संजीव यादव, सुखदेव भोसले,सुरेश केसवड, दादासो लोणकर या सर्वांनी आपली मनोगत व्यक्त करताना आपल्या आयुष्यात काम करत असताना प्रगतीच्या शिखरावर असताना BSF मुळेच ओळख प्राप्त झाली व BSF(सीमा सुरक्षा दल) चे आभार मानावे तितके कमीच आहेत असे सर्वांना पटवून दिले.

     या कार्यक्रमासाठी संजीव यादव,ASI अशोक कोळसे,ASI जयवंत पाटील, रिटायर्ड ASI दशरथ मोरे, ASI बी पी बोदगिरी,सुरेश केसवड,डी एस शिंदे,युवराज बनकर,आर पी शिंदे,सुनिल नाईक,विकास मांढरे,दिलीप चव्हाण,जहांगीर पठाण,महमद शेख,डी ए लोणकर,आर झेड अलगुडे,पोपट शेजवळ,एच एन पाटील,बी एस कांबळे,सुखदेव भोसले,डी ए कर्णे, उदय चव्हाण, बी बी कामटे हे सर्व आजी माजी BSF जवान आपल्या परिवार सह या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी पी बोदगिरी यांनी केले तर आभार व्यक्त उदय चव्हाण यांनी व्यक्त केले.